गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोनाचा पुन्हा प्रसार होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे. त्या अनुषंगाने काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाबाधितांचा रोज वाढणारा आकडा राज्य सरकारसाठी आणि आरोग्य प्रशासनासाठी देखील चिंतेची बाब ठरला आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात एकूण १० हजार २१६ करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ५५ हजार ९५१ झाली आहे. त्याच वेळी राज्यात गेल्या २४ तासांत करोनामुळे ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.