पुणे – शहर लॉकडाऊनच्या दिशेने जाण्याची भीती निर्माण झाली असून, गेल्या २४ तासांत ९०४ बाधितांची नोंद महापालिकेने केली आहे. तर दिवसभरात नऊ बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोन पुण्याबाहेरील आहेत. बाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढत असून, गेल्या आठ दिवसांत ती पाचशेवरून नऊशेवर पोहोचली आहे. गेल्या तीन-चार दिवसात तर ती सातशेपेक्षा जास्त होती. मात्र, गुरूवारी ती ९०४ झाली. आजपर्यंत शहरात ११ लाख ७० हजार ३८३ टेस्ट झाल्या असून, त्यातील बाधितांची संख्या आता २ लाख ५ हजार ५५३ झाली आहे. त्यातील १ लाख ९४ हजार ७९१ रुग्ण बरे झाले आहेत. गुरूवारी ५६२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या २४ तासांतील सात मृतांचा समावेश करून एकूण मृतांची संख्या ४ हजार ८७६ झाली आहे.