रत्नागिरी – कोरोना रूग्णांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाल्यानं परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. भविष्यातही अशी स्थिती राहिली तर कोरोना रौद्ररूप धारण करण्यची शक्यता नाकारता येत नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वच्छ भारत महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. अब्दुल रेहमान वणू यांनी दिली आहे.

कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ धुणं आणि सुरक्षित अंतर राखणं खूप आवश्यक आहे. कोरोनापासून मुक्ती हवी असेल तर सरकारनं जारी केलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी सांगितलं.
सर्वांनी जर या वाढत्या कोव्हिडच्या काळात स्वतःची जबाबदारी पाळली नाही तर पुन्हा एकदा त्याच परिस्थितीला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते अशी चिंता डॉ. वणू यांनी व्यक्त केली आहे.

दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशनचा महासचिव आणि सोशल रिफॉर्मर डॉ अब्दुल रेहमान वणू यांनी सांगितलं की, ज्या वेगानं कोव्हिड 19चे रूग्ण वाढत आहेत त्यावरून परिस्थिती सामान्य नाहीये हे स्पष्ट होत आहे. अचानक वाढलेल्या या रूग्ण संख्येला कुठे तरी आपणच जबाबदार आहोत. जो पर्यंत आपण आपली जबाबदारी ओळखणार नाही तोपर्यंत या महामारीपासून आपला बचाव होऊ शकत नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे.

गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या ‘नजरिया’ या त्यांच्या पुस्तकाच्या निमात्तानं ते चर्चेत आले होते. सर्वसामान्य माणसांचं आयुष्य अंतर्बाह्य कसं बहरेल या अनुशंगाने त्यांनी आपले विचार पुस्तकात प्रकट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक असलेले डॉ. अब्दुल रेहमान वणू लोकांना डॉक्टरांनी सांगितलेल्या उपाययोजनांचं पालन करण्यासठी प्रोत्साहन देत आहेत. आपली जबाबदारी ओळखलात तरच या रोगाला आपण मत देऊ शकणार आहोत. लोकांच्या निष्काळजीपणा मुळे आज पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये, सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला पुन्हा एकदा हरवूया असंही आवाहन त्यांनी केलं आहे.