रत्नागिरी: जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ८५६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत ९ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९४.५७ इतकी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत ३६२ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामध्ये रत्नागिरीतील ९३, चिपळूणमधील ८६, खेडमधील ५७, दापोलीतील ३९, संगमेश्वरमधील ३८ रुग्णांचा समावेश आहे. मृतांची टक्केवारी ३.६७ टक्के असून ही महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये असून गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा धोका अधिकच वाढू लागला आहे. आतापर्यंत ७७ हजार २५० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.