रत्नागिरी : आंबेत आणि म्हाप्रळ दरम्यान बंद पडलेली फेरी बोट सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ग्रामस्थ आणि फेरी बोट प्रशासनामध्ये यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा 50 किलोमीटरचा वळसा वाचणार आहे.
रायगडमधील आंबेत आणि रत्नागिरीतील म्हाप्रळ या दोन गावांच्या दरम्यान अंबेत खाडीमध्ये सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हीसेस प्रा. लि. कंपनीने आंबेत पूल बंद होत असल्यामुळे सामान्य जनतेची प्रवासाची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी फेरीबोट सुरु केलेली होती. या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी फेरीबीटीतून मोफत प्रवास करण्याची मागणी होती. पण सुर्वणदुर्ग शिपिंग कंपनीनी त्यास नकार दिला होता. याच कारणामुळे फेरीबोट सेवा बंद पडली होती.
परंतू आज दि. २०.०२.२०२१ रोजी दोन्ही गावाचे ग्रामस्थ व सुवर्णदर्ग शिपिंग व मरीन सहीसेस प्रा. लि. कंपनीचे चेअरमन डॉ. चंद्रकांत ज. मोकल व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. योगेश चं. मोकल तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत दापोली येथे मिटींग घेण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांचे गैरसमज दूर करण्यात आले व त्यांच्याच शुभहस्ते आज संध्या. ६ वाजल्यापासून फेरीबीट सुरू करण्यात आलेली आहे. फेरीबोट आंबेत पुलाचे काम संपेषर्यत चीवीस तास सुरु राहील, अशी माहिती डॉ. योगेश मोकल यांनी दिली आहे.