दापोली: राज्यातील नगरपालिकांना वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. सन २०१९-२०२० करीता दापोली नगरपंचायत यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील नाल्यावर स्लॅब टाकणे व नाल्याच्या दोन्हा बाजूने आर. सी. सी. बांधकाम करणे या कामांकरीता रू. १.२५ कोटी मंजूर करण्यात आला आहे.
यासंदर्भात उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी सांगितले की, आमदार योगेश कदम यांचा पुढाकार व सातत्याने असलेला पाठपुराव्यामुळेच हा निधी मिळाला आहे. याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमी असून यामुळे अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरण कामास अधिक गती येणार असल्याचे पुसाळकर यांनी सांगितले.