शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना दोन राज्यस्तरीय ‘समाज रत्न’ पुरस्कार जाहीर

युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना दोन राज्यस्तरीय ‘समाज रत्न’ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नांना लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडणारे युवा पत्रकार तथा ‘ग्रामीण वार्ता’ डिजिटल मीडियाचे संपादक मुझम्मील काझी यांना दोन राज्यस्तरीय ‘समाज रत्न’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

ग्रामीण पत्रकारितेद्वारे सामाजिक समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांचा हा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अन्याय, प्रशासकीय अडचणी आणि जनहिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यासाठी काझी यांनी डिजिटल पत्रकारितेचा प्रभावी वापर केला.

‘ग्रामीण वार्ता’ डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक प्रश्नांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या वृत्तांकनामुळे अनेक प्रलंबित प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचले असून, समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

पत्रकारितेतील या योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी नऊ वेळा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

याच कार्याचा गौरव म्हणून ‘वर्ल्ड फॉर नेचर इंडिया’च्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे त्यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘निसर्ग मित्र मेळावा व दुसरा राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६’ मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

याशिवाय कपिलेश्वर येथील मंथन फाऊंडेशनच्या वतीनेही काझी यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, ५ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येईल.

लोकहिताच्या पत्रकारितेसाठी मिळालेल्या या दुहेरी सन्मानामुळे त्यांच्यावर पत्रकारिता क्षेत्रातून आणि विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Gramin Varta Digital Media, Kolhapur, Maharashtra Journalism Awards, Manthan Foundation, Muzammil Kazi, ratnagiri news, Rural Journalism, Samaj Ratna Award, World For Nature India

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *