Dapoli: कोकणातील निसर्गरम्य दापोलीत नेहमीच अनेक राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची वर्दळ असते. मात्र, जेव्हा एखादा मोठा अधिकारी दापोलीच्या दौऱ्यावर येतो, तेव्हा त्यांच्या निवासासाठी दापोलीतील ‘समाली हॉटेल’लाच सर्वाधिक पसंती दिली जाते.

काल, शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे दापोलीच्या दौऱ्यावर आले होते. या महत्त्वाच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी विश्रांती आणि निवासासाठी समाली हॉटेलचीच निवड केली.

दापोलीमध्ये पर्यटकांसाठी अनेक नामांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध असली तरी, प्रशासनातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी समाली हॉटेलला दिलेली पसंती या हॉटेलच्या उत्तम सेवेची, सुरक्षिततेची आणि लोकप्रियतेची साक्ष देते.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या या मुक्कामामुळे दापोलीत पुन्हा एकदा समाली हॉटेलचीच चर्चा रंगली असून, व्हीआयपी आणि अधिकाऱ्यांचा हा सर्वाधिक आवडता थांबा असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. समालीचे व्यवस्थापक दिनेश कुमार यादव यांनी यावेळी हॉटेलमध्ये सर्वांचं स्वागत केलं.