Dapoli : हर्णै एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल व ह्युज ज्युनिअर कॉलेजमध्ये ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शाळेच्या वाचनालयात भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन संस्था अध्यक्ष अस्लम खान व पाजपंढरी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक जयंत सुर्वे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी हर्णै ग्रामपंचायत वाचनालयाला भेट देऊन वाचनाचा छंद जोपासत शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे एक तास वाचन केले.
या निमित्ताने शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उर्दू निबंध स्पर्धेत अलिना इम्रान काजी, आफरा अजिम झोंबडकर आणि सिद्दिक युसूफ नुरानी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
इंग्रजी निबंध स्पर्धेत तहरीम तौसिफ पंतावे, नाज सलिम चिपळूणकर आणि जोया जब्बार अकबाणी यांनी यश मिळवले. वक्तृत्व स्पर्धेत आनम नईम गांवकरकर, शहेजीन शब्बीर आरेकर, अलिना इम्रान काजी आणि आफरा अजिम तळघरकर यांनी अनुक्रमे पहिले चार क्रमांक मिळवले.
चित्रकला स्पर्धेत सिमरन इम्रान झोंबडकर, मर्जिया ताबीश झोंबडकर आणि हुजेफा रफीक झोंबडकर यांनी यश संपादन केले. रांगोळी स्पर्धेत रिदा शब्बीर आरेकर आणि हुजेफा रफीक झोंबडकर यांच्या गटाने प्रथम, तर तहरीम इर्शाद महालदार, अरबिना मुर्तजा गांवकरकर आणि नाज मुदस्सर सय्यद यांच्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवला.
अलिना आसिफ अकबाणी, सिमरन इम्रान झोंबडकर, आफरा अजिम झोंबडकर, जैनब अजिम शिरगावकर यांच्या गटाने तृतीय आणि मोहम्मद कैफ तनवीर महालदार, हसनेन मोहसीन सोलकर, हस्सान सिद्दिक राजपुरकर, सिद्दिक युसूफ सुरांनी या गटाने चौथा क्रमांक पटकावला.
यानंतर कुराण वाचनाचे प्रक्षेपण करून जुबेर मुल्ला आणि इर्शाद खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला फर्स्ट एड बॉक्स, तर माजी विद्यार्थिनी मुबश्शिरा जहूर गांवकरकर हिने पुस्तके भेट दिली. ज्येष्ठ शिक्षक जयंत सुर्वे यांनी वाचन दिनाचे महत्त्व, विविध कविता, दाखले आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल सविस्तर माहिती देऊन पुस्तकांसाठी शाळेला एक हजार रुपयांची देणगी दिली.
शाळेचे मुख्याध्यापक आसिफ भाटकर यांनी जयंत सुर्वे यांचा पुस्तक देऊन सत्कार केला व यापुढे कोणत्याही कार्यक्रमात पुष्पगुच्छ न देता पुस्तक देऊन सत्कार करण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक मुबीन बामणे यांनी केले आणि आभार मुख्याध्यापक आसिफ भाटकर यांनी मानले.
कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष अस्लम खान, उपाध्यक्ष इर्शाद महालदार, स्कूल कमिटी अध्यक्ष सईद चिकटे, कॉलेज प्राचार्य अलमास नाखवा यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

