दापोली: जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब दापोलीच्या वतीने गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला लायन्स क्लब दापोलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुरुप्रसाद बेर्डे, झोन ऑफिसर निलेश हेदुकर, गोपाळकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष प्रसाद मेहता, उपाध्यक्ष अतुल मेहता, पतसंस्थेचे व्यवस्थापक बी. आर. मोरे, कर्ज अधिकारी स्वप्नील शिंदे, वसुली अधिकारी विजय आंजर्लेकर, विशाल रेवाळे, पासिंग ऑफिसर परवीन टिकले, कर्मचारी स्मिता झगडे, जयवंत चव्हाण आणि संदीप महादवे आदी उपस्थित होते.

