दापोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोकण विभाग दापोली तालुका कार्यकारिणीवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी भगवान घाडगे, तर सचिवपदी अशोक जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
यासोबतच संस्थेच्या सदस्यपदी संजय महाडीक, राजेंद्र फणसे, नरेंद्र मांडवकर, भाऊ मोहिते, निवास जाधव आणि शरद जाधव यांची नियुक्ती झाली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य असल्याची भावना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून दापोली तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

