दापोली : तालुका काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३५ व्या स्मृती दिनानिमित्त दापोली काँग्रेस कार्यालयात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
देशाच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर होत असलेले आक्रमण आणि सत्तास्थानी बसलेल्या संविधान विरोधी शक्तींच्या विरोधात काँग्रेसी विचारधारेवर दृढ विश्वास ठेवून एकजुटीने लढा देण्याचा निर्धार या सभेमध्ये करण्यात आला.
या अभिवादन सभेला तालुकाध्यक्ष मंगेश मोरे, उपाध्यक्ष श्रीकांत मुंगशे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सिराज रखांगे, तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मकबूल दिनवारे आणि सेवा दल तालुकाध्यक्ष प्रकाश मंडपे उपस्थित होते.
या प्रसंगी तालुका अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मकबूल दिनवारे आणि काँग्रेस सेवा दलाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मंडपे यांचे तालुकाध्यक्ष मंगेश मोरे यांनी अभिनंदन केले.

