
मुंबई: शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुका आणि पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत.
यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या अत्यंत महत्त्वाच्या पट्ट्याची जबाबदारी आमदार किरण सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
त्यांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभागीय संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध विभागांसाठी अनुभवी आमदारांना आणि मंत्र्यांना रिंगणात उतरवले असून, यामध्ये किरण सामंत यांच्या खांद्यावर दक्षिण कोकणचा भार टाकून त्यांच्या कामावर विश्वास दर्शवला आहे.

प्रमुख विभागीय नियुक्त्यांची यादी:
संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी खालीलप्रमाणे विभागनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे, संपर्कप्रमुख दक्षिण कोकण (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) किरण सामंत, उत्तर कोकण (रायगड आणि पालघर) भरत गोगावले, पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर) दगडू दादा सकपाळ, मराठवाडा (धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेड) प्रकाश आबिटकर, पूर्व विदर्भ (१) (नागपूर, भंडारा आणि गोंदिया) दीपक सावंत, पूर्व विदर्भ (२) (वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली) मनीषा कायंदे, पश्चिम विदर्भ (अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा) संजय राठोड

Leave a Reply