रत्नागिरीतील ९१ शाळांना संगणक संचांचे वाटप

रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ जिल्हा परिषद शाळांना भाजप आमदार निरंजन डावखरे आणि नीलिमा डावखरे यांच्या पुढाकारातून संगणक संचांचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगात सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

या वाटप कार्यक्रमात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील शाळांचा समावेश होता.

यावेळी नीलिमा डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे, वर्षा ढेकणे आणि मनोज पाटणकर यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण झाले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील मुलांना संगणकीय ज्ञान मिळावे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. भविष्यातही अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवले जातील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या प्रसंगी विविध तालुका मंडल अध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*