
रत्नागिरी : शहरातील माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
मांडवी येथील गगनगिरी हॉलमध्ये रविवारी हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी राज्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपदा तळेकर यांनी हातावर शिवबंधण बांधले.
या सोहळ्याला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, शिवसेना शहरप्रमुख विपिन बंदरकर, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आणि महिला शहर प्रमुख स्मिता पावस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासोबतच ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदेश मयेकर, संजय साळवी, नगरसेवक बंटी कीर, राजू कीर, निवेदिता कळंबटे, विजय खेडेकर, श्रद्धा हळदणकर, वैभव खेडेकर, राकेश नागवेकर आणि मुन्ना चवंडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपदा तळेकर यांच्या या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी शहरात शिवसेनेची ताकद वाढली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Leave a Reply