सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे इंडियन टॅलेंट ऑलम्पियाडमध्ये यश

दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलम्पियाड स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत उल्लेखनीय कामगिरी करत राज्य पातळीवर शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत विविध विषयांत विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली असून यामध्ये पहिलीतील आद्य आनंद पांगारकर याने इंग्रजी विषयात राज्य पातळीवर पाचवा क्रमांक पटकावत एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे.

विज्ञान विषयात नववीतील श्रियान्स सुजय मेहता याने १४ वे स्थान, तर गणित विषयात चौथीतील झैनब तौफिक मुरुडकर हिने १८ वे स्थान प्राप्त केले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन सुजय मेहता आणि मुख्याध्यापिका रितू मेहता यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभागी होऊन यश संपादन करावे, अशी अपेक्षा शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*