
मालवण : तब्बल ३७ वर्षांनंतर मालवण तालुक्यातील त्रिंबक पंचक्रोशीतील जनता विद्या मंदिर, त्रिंबक या शाळेतून सन १९८८-८९ मध्ये इयत्ता दहावी पूर्ण करणाऱ्या वर्गमित्र-मैत्रिणींचे स्नेहसंमेलन आचरे येथील डेफोडिल्स रिसॉर्टमध्ये उत्साहात पार पडले.
सन १९८९ च्या काळात मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इतर कोणतेही सोशल मीडिया नसल्याने दहावीनंतर प्रत्येकजण आपापल्या मार्गाने पुढे गेला. दरम्यानच्या काळात बराच पाणी पुलाखालून वाहून गेले. साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून मित्रमैत्रिणी पुन्हा जोडले गेले आणि ‘कधीतरी एकत्र येऊया’ असा विचार पुढे आला.
या स्नेहसंमेलनात अनेक मित्रमैत्रिणींना तब्बल ३७ वर्षांनंतर प्रथमच प्रत्यक्ष भेट झाली. वयानुसार शारीरिक बदल, चेहऱ्यावरील फरक यामुळे अनेकांना एकमेकांना ओळखताना धक्का बसला, पण ही भेट सर्वांना अत्यंत सुखद आणि भावनिक ठरली.
या कार्यक्रमात विशेष आकर्षण होते ते त्यांच्या शिक्षकांचे! इयत्ता दहावीपर्यंत अध्यापन केलेले उदय मेहेंदळे, गोविंद गांवकर, सदानंद गवस, हेमांगी खोत, अर्चना बागवे, विशाखा पोयरेकर तसेच तत्कालीन शालेय शिपाई रोहीदास गोसावी आणि शत्रुघ्न त्रिंबककर हेही आवर्जून उपस्थित राहिले.
स्नेहसंमेलनात परस्पर परिचय, गमतीशीर खेळ, सहभोजन आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा पहिला भव्य स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी दिनेश त्रिंबककर, संदेश रावले, श्रीकृष्ण पडवळ, अरुणा पवार, दुर्गाप्रसाद ठाकूर, मोतेस फर्नाडिस, संदीप तेली, विनायक त्रिंबककर, संतोष साटम, गंगाधर चिंदरकर, रविंद्र जोईल, संगीता त्रिंबककर, प्रवीण अपराज, प्रशांत मेहेंदळे, जयवंत तावडे, अजय पवार, कुंदा आमरे, सुनीता नार्वेकर, नंदा मेस्री, नारायण बागवे आदी अनेक वर्गमित्रांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्नेहसंमेलनाने जुनी आठवणी ताज्या केल्या असून, सर्वांनी पुढील भेटींसाठी उत्सुकता व्यक्त केली आहे.

Leave a Reply