रत्नागिरी दक्षिणमधील महिला बचत गटांचे तालुकास्तरीय संमेलन उत्साहपूर्ण संपन्न

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वदेशी’ संकल्पनेवर आधारित भा.ज.पा. रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चाच्या वतीने तालुका स्तरीय महिला बचत गट संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या संमेलनात विविध बचत गटांच्या कार्यकर्त्या आणि सीआरपी प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

संमेलनात महिलांच्या उद्योगांना चालना, स्थानिक स्वदेशी उत्पादनांचे उत्पादन-विपणन वाढ आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. महिला जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांनी मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘स्वदेशी प्रसार’ सूचनांचे महत्त्व अधोरेखित करताना स्थानिक उत्पादने वापरा, महिलांच्या हाताला काम द्या आणि घरगुती व्यवसायांना व्यासपीठ द्या, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे नियोजन मध्यमंडल तालुकाअध्यक्ष सुचिता नाचणकर व अनुष्का शेलार यांनी केले. अनुश्री आपटे, नुपुरा मुळे, शिवानी रेमुलकर, शुभांगी घाणेकर, सायली केतकर, मंदा ठीक, मेधा देवस्थळी, केतकी केळुसकर, नम्रता इंगवले, वैभवी पालेकर, अश्विनी शेलार, मंजिरी चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर महिलांची उपस्थिती लाभली.

शेवटी स्वदेशी, उद्योजकता आणि बचत गटांच्या महत्त्वावर भर देत महिलांनी उत्साहाने पुढील कार्ययोजनांवर चर्चा केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*