▪आयपीतील स्पर्धांचा यंदाचा हंगाम हा कोरोनाच्या सावटाखाली संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

▪या स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर बंगळुरू अर्थात RCB या संघात आदित्य ठाकरेचा समावेश करण्यात आल्यामुळे सध्या हे नाव चर्चेत आले आहे.

प्रकरण काय? :

▪️ स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारा विदर्भाचा गोलंदाज आदित्य ठाकरे याची निवड RCB च्या डेव्हलपमेंट स्कॉडमध्ये झाली आहे.

▪️ सद्यस्थितीत नेट्समध्ये फलंदाजांना सराव देण्यासाठी आदित्यची निवड करण्यात आली असून यामध्ये चांगली कामगिरी केल्यास त्याला पुढेही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

▪️ आदित्यला 2018 मध्ये खेळाडू जखमी झाल्यानंतर ज्युनिअर वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडला पाठवण्यात आले असता त्याने तिथे केलेल्या दमदार कामगिरीमुळे तो प्रकाशझोतात आला होता.

▪दरम्यान, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या नावाशी साधर्म्य असल्याने RCB संघ आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सध्या माध्यमांत रंगली आहे.