हर्णे (दापोली) : हर्णेच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना एक आगळावेगळा अनुभव देणारा, अक्षय फाटक यांचा ‘अगस्त्य सी व्ह्यू रिसॉर्ट ॲन्ड स्पा’ या भव्य प्रकल्पाचं गुरुवारी उद्घाटन झालं.

या सोहळ्याला राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांच्यासह दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर, पर्यटन विषयाचे अभ्यासक आणि माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, बारामती टाऊन प्लानर विकास ढेकळे, मुळ जमीन मालक मिलिंद जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढली.

अक्षय फाटक यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि दापोलीकर मोठ्या संख्येने या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते.

‘अगस्त्य हॉस्पिटॅलिटी’ अंतर्गत ‘अगस्त्य सी व्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा’ हा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा सी व्ह्यू रिसॉर्ट आहे. या ४ स्टार प्रॉपर्टीमध्ये १२० हून अधिक आलिशान सुट रूम्स आहेत.

समुद्राच्या दिशेने असलेले ९० आसनी बहु-व्यंजन रेस्टॉरंट ‘ट्रॉपिकल वेव्ह’ हे पर्वत आणि समुद्राच्या मध्यभागी वसलेले असून येथून समुद्राचे विलोभनीय दृश्य दिसते.

येथे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थ तसेच स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. विशेष म्हणजे, समुद्रकिनारी असूनही, येथे १००% शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेता येईल.
रिसॉर्टमधील इतर सुविधा
कॅफेस्विमिंग पूल
स्विमिंग पूल
पार्टी लॉन्स
कॉन्फरन्स रूम

जीम
सलून आणि स्पा
३०० पर्यंत पाहुण्यांसाठी लग्नाचे आयोजन करण्याची सुविधा

‘अगस्त्य सी व्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा’ हे फाइन डाइनिंग, पूल पार्टीज, इव्हेंट्स, कॉन्फरन्स आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी देखील योग्य आहे.
हर्णेच्या या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळावा, या उद्देशाने ‘अगस्त्य सी व्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा’ची संकल्पना साकारण्यात आली आहे.

अगस्त्य ऋषर्षीच्या मूर्तीचे अनावरण

कार्यक्रमातील एका महत्त्वाच्या क्षणी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांनी समुद्राच्या पाण्यात वज्रासन मुद्रेत विराजमान असलेल्या अगस्त्य ऋषींच्या भव्य मूर्तीचे अनावरण केले. ही मूर्ती भारतीय संस्कृती, परंपरा आणि गौरवाची प्रतीक मानली जात आहे.

पद्मश्री वासुदेव कामत यांनी आपल्या मनोगतात ‘अगस्त्य हॉस्पिटॅलिटी’च्या निर्मितीसाठी अक्षय फाटक यांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जळगावकर यांनी या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे सांगितले. पर्यटन विषयाचे अभ्यासक आणि माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांनी ‘अगस्त्य हॉस्पिटॅलिटी’ हा प्रकल्प कोकणच्या पर्यटनाला एक वेगळे परिमाण देईल असे प्रतिपादन केले.
रिसेप्शन आणि रेस्टॉरंटचे उद्घाटन

राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी रिसेप्शन आणि रेस्टॉरंटचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी अक्षय फाटक यांच्या उद्योजकतेचे कौतुक केले आणि ‘अगस्त्य हॉस्पिटॅलिटी’ मुळे हर्णेच्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

फाटक डेव्हलपर्सचा प्रवास
सुदेश मालवणकर यांनी ‘फाटक डेव्हलपर्स’ आणि अक्षय फाटक यांच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. आजच्या युवा पिढीला एक नवीन दिशा देणारे, अनेक भव्य इमारतींचे निर्माते, ‘फाटक डेव्हलपर्स’चे मालक आणि जळगावचे सरपंच म्हणून अक्षय फाटक यांनी आपल्या कार्याने गावाला एक नवीन ओळख दिली आहे.
अक्षय फाटक यांची प्रस्तावना आणि आभार

अक्षय फाटक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानले.

‘अगस्त्य सी व्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा’च्या माध्यमातून पर्यटकांना दर्जेदार सुविधा पुरवल्या जातील आणि हर्णेच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी एकदा तरी या ठिकाणाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुश्ताक खान यांनी केलं




