मुश्ताक खान / रत्नागिरी
कोरोनाच्या या महामारीत तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि झाकण असलेलं एन95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं ध्यानात घेणं आवश्यक आहे. झाकण असलेलं एन95 मास्क कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या मोहिमेसाठी बाधक आहे, अशी माहिती आरोग्य सेवेच्या व्यवस्थापकीय संचालक (आरोग्य मंत्रालय) राजीव गर्ग यांनी दिली आहे.
बदलत्या काळानुरूप घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता मास्क शिवाय बाहेर पडणं अशक्य झालं आहे. मास्क माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. मास्क हा कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर प्रशासनामार्फत कारवाईही केली जात आहे.
पण यामध्ये सर्वांत गहन प्रश्न सध्या विचारला जात आहे, तो म्हणजे तुम्ही योग्य मास्क वापरत आहात का? आपल्या मास्कमुळे कोरोना वाढण्याची भिती तर नाहीये ना? म्हणूनच केद्र सरकारनं चुकीच्या एन95 मास्क वापरत असलेल्या व्यक्तींना सावधानतेचा इशारा दिला आहे. झाकण असलेलं मास्क वापरू नये, असा सल्ला केंद्र सरकारच्या आरोग्य विभागं सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना दिला आहे.
देशभरातील सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात राजीव गर्ग यांनी झाकण असलेल्या मास्तच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “झाकण असेललं एन95 मास्क वापरणाऱ्याचं संरक्षण करू शकणार आहे. पण कोरोनाचे कण बाहेर पडणं त्यामुळे थांबू शकणार नाहीयेत. त्या झकणामधून कोरोना बाधित व्यक्तीच्या तोंडातून कोरोना व्हायरसचे कण बाहेर पडू शकणार आहेत. त्यामुळे ते एक आभासी संरक्षण ठरू शकणार आहे. पण प्रत्यक्षात कोरोनाच्या उपाययोजनांसाठी ते निष्प्रभ ठरणार आहे.” संबंधितांना योग्य मास्क वापरण्याच्या सुचना देण्यात याव्यात अशी पुष्टीही त्यांनी पुढं जोडली आहे.”
केंद्राच्या या सुचनांचं पालण करणं सर्वांसाठी नितांत आवश्यक आहे. यामुळे आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींचं संरक्षण करू शकणार आहेत. सर्वांनी सर्जीकल मास्क किंवा घरच्या घरी बनवलेला कॉटनचा मास्क वापरणंही फायदेशी, आहे असं केंद्रानं आपल्या एडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे.