राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांचा २० सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे.
किंगमेकरच्या भूमिकेत असणाऱ्या रवीदादांनी गेल्या दहा वर्षांपासून कोकणात लक्ष घातलं आहे. रा. स्व. संघाशी निगडित, माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे असणारे रवीदादा यांनी गेल्या ३५ वर्षांत जबरदस्त कामगिरी केली आहे.
राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या रवीदादांविषयी…
रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत कोट्यवधी रुपयांची कामे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सुरू आहेत.
रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था पाहून मंत्री चव्हाण यांनी या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याकरिता पुढाकार घेतला.
एवढेच नव्हे तर कोकणातील ९ रेल्वेस्थानकांचे अद्ययावतीकरण, सुशोभिकरण करून प्रवाशांना सुखद धक्का आणि पर्यटन वाढीसाठी बहुमोल योगदान दिले आहे.
काही रेल्वेस्थानकांचे लोकार्पण झाले असून रत्नागिरीसह अन्य स्थानकांचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष उल्लेखनीय काम म्हणून याकडे पाहता येईल.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि थोडे काम रेंगाळले असल्याने कोकणवासियांच्या भावनांचा आदर करत बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले.
दर महिन्याला कामकाजाचा आढावा घेतला, काम का रेंगाळले आहे, काय अडथळे आहेत याची माहिती घेत त्या त्या ठिकाणचे प्रश्न सोडवत रवीदादांनी या कामाला गती दिली.
गणेशोत्सवात चाकरमान्यांना या रस्त्यावरून सुरळित, सुरक्षित प्रवास होण्याकरिता विशेष खबरदारी घेतली. नजीकच्या कालावधीत हा महामार्ग पूर्णत्वास जाईल.
रत्नागिरीतील तेली समाज भवनाकरिता भरघोस निधी, सोमेश्वर येथील शांतीपीठात गो सेवेसाठी शेड उभारणीकरिता निधी देण्यात रवीदादांनी मागेपुढे पाहिले नाही.
अभ्यासू, बारकाईने प्रश्न समजून घेणारे, दिलदार व्यक्तीमत्व म्हणून ते सुपरिचित आहेत.
रवीदादा हे अनेक वर्षांपासून भाजपामध्ये कार्यरत आहेत.
२००२ मध्ये भाजयुमोचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष, २००५ मध्ये नगरसेवक, २००७ मध्ये कल्याण- डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपद मिळाले.
२००९ च्या निवडणुकीत डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. २०१४ व त्यानंतर २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकण पट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी सलग तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला.
२०१६ मध्ये प्रथमच बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
२०२० मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक झाली आणि मोठी जबाबदारी पक्षाने दिली. शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर पक्षाने विश्वासाने कॅबिनेट मंत्रिपद दिले.
सार्वजनिक बांधकाम खाते ते सांभाळत आहेत. तसेच पालघर आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून समर्थपणे काम करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने “सबका साथ सबका विकास” हेच विकासाचे धोरण ठेऊन प्रगतीची घोडदौड सुरू केली.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी रवीदादांकडे कोकण क्लस्टरची जबाबदारी देण्यात आली आणि कोकणात सर्व जागा भाजप महायुतीने जिंकल्या.
त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी जिंकली. या सर्व निवडणुकीत किंगमेकरची भूमिका रवीदादांनी पार पाडली.
मागील दोन वर्षांच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात 92 हजार कोटींची विकासकामे करण्यात आली.
स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच या खात्याच्या माध्यमातून विकास कामे करण्यात आली आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावागावांचे रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग काम करत आहे. यामुळे या गावांना प्रथमच चांगल्या रस्त्यावरून प्रवास करणे शक्य झाले आहे.
रत्नागिरीत भाजपाची ताकद वाढण्यासाठी रवीदादा सर्व ते प्रयत्न करत आहेत. या दृष्टीने भाजपाचे अद्ययावत संपर्क कार्यालय कुवारबाव येथे महामार्गालगत उभे राहत आहे. याची सर्व जबाबदारी रवीदादांनी घेतली आहे.
शत प्रतिशत भाजपा करण्याकरिता त्यांचे प्रयत्न आहेत. वाडीवस्तीवरील कार्यकर्त्याला बळ देत आहेत.
रवीदादा हे हिंदुत्ववादी भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व या विचारधारेचे अनुयायी असल्याने नेहमीच देशहित व पक्षादेश शिरसावंद्य मानून जी कामगिरी सोपवली ती कर्तव्य कठोरपणे पूर्ण केली आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.