दापोली- आषाढी एकादशीनिमित्त दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत पंढरीची वारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विठुराया, रुक्मीणी आणि वारकऱ्यांच्या वेषात शाळेतील विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी साजरी केली.

चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांच्या हस्ते पंढरीची वारी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन मुळे, पोलीसपाटील गौरी पागडे, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शिक्षक बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, ज्येष्ठ वारकरी गणपत मुलूख, गौरी मुलूख आदी मान्यवर उपस्थित होते.

आषाढी एकादशीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडी, भजन, फुगड्या, रिंगण आदी कार्यक्रम सादर केले. चंद्रनगर शाळेत आषाढी एकादशीनिमित्त साजरा झालेला पंढरीच्या वारी कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक पालकही उपस्थित होते.