दापोली : चिपळूण येथील वाशिष्टी नदीच्या काठावर वसलेल्या मालदोली या नयनरम्य गावामध्ये दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी मंडळस्तरीय शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. संजय भावे म्हणाले, शेती ही कधीच तोटयाची नसते. ती व्येवहारीक पध्दतीने केली पाहिजे. शेतीमध्ये महिलांचा सहभाग जास्त असल्याने त्यांच्याव्दारे केली जाणारी शेती कधीच तोट्यात जाणार नाही.
कृषी विभाग, घरडा केमिकल्स यांच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आयोजित मंडळस्तरीय शेतकरी मेळावा आणि प्रदर्शन ही एक सुरुवात आहे.
यानंतर पूर्णपणे प्रात्यक्षिकावर आधारीत समन्वयाने कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शेतकन्यांचे सक्षमीकरण कसे होईल यासाठी विद्यापीठ सदैव प्रयत्नशिल राहील.
आज मालदोली गावामध्ये येत असताना निसर्ग आणि भौगोलिक प्रदेश बघून आणि आपल्या मालदोलीच्या शेती संस्कृतीचा वारसा आणि आदरातिथ्याने मी भारावून गेलो.
ते पुढे म्हणाले की, अशा प्रकारचे माझे केलेले स्वागत माझ्या कायम स्मरणात राहील. मी शिक्षण क्षेत्रातला माणून असूनही ज्या पध्दतीने तुम्ही माझे स्वागत केलेत त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याबरोबरच त्यांनी घरडा केमिकल्सचे विशेष आभार मानले
यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक, डॉ. प्रमोद सावंत, मालदोली सरपंच अबिदा तांबे, उपसरपंच योगेश भोबेकर, माजी पंचायत समिती सभापती पांडुरंग माळी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश हरवंदे, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र माने, सहाय्यक गटविकास अधिकारी भास्कर कांबळे, विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संतोष सावर्डेकर, डॉ. प्रफुल्ल माळी, डॉ. नरेंद्र प्रसादे, डॉ. प्रफुल्ल आहिरे, डॉ. मंदार खानविलकर, डॉ. सुदेशकुमार चव्हाण, घरडाचे सीएसआर प्रमुख बापूसाहेब पवार उपस्थित होते.
मान्यवरांचे आगमन होताच कोकणातील प्रसिध्द खालूबाजा, लेझीम याव्दारे पुष्पवृष्टी करुन मोठ्या दिमाखात मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भैरी वाघजाईला वंदन करुन दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कवी श्रीकृष्ण गंगावणे रचित मालदोली गौरवगीताने कार्यक्रम बहरला.
मान्यवरांचे मालदोली गावातील विविध शेती उत्पादने, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रश्नोत्तर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रदीप गोखले, प्रविण कांबळे, धनंजय केतकर, परशुराम वाजे, भालचंद्र खळे यांनी विविध शेतीविषयक प्रश्न शास्त्रज्ञांना विचारले. त्याची समर्पक उत्तरे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिली.
यानंतर महाय्यक गटविकास अधिकारी भास्कर कांबले उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र माने, मालदोली सरपंच श्रीमती अबिदा तांबे, घरडाचे बापूसाहेब पवार आदिंनी आपली मनोगते व्यक्त केली.
विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, आपण आमचे कुटुंब प्रमुख कुलगुरु डॉ. संजय भावे यांचे केलेले स्वागत आम्हाला कौतुकास्पद आहे. आपला कृषी क्षेत्रातला शाश्वत विकास सर्व संस्थांच्या माध्यमातून निश्चितपणे करु असे सांगितले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना पांडुरंग माळी यांनी गावाचे वैशिष्टय विषद केले. त्याबरोबरच गावाच्या सर्वागिण विकासासाठी विद्यापीठ, कृषी विभाग आणि घरडा केमिकल्स यांचे आभार मानले.
यावेळी परिसरातील १६ गावातील २५ प्रगतशिल शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र, कृषी दैनंदिनी व सोनचाफ्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कामधेनू कृषी विकास प्रतिष्ठान यांच्यामार्फत पहिला कामधेनू जीवन गौरव पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांना संस्थेचे विश्वस्त डॉ. संतोष वरवडेकर, डॉ. नरेंद्र प्रसादे, डॉ. प्रफुल्ल माळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मार्गताम्हाणे मंडळातील दोणवली, भोम, कापरे, बिवली, गांग्रई, करंबवणे, कात्रोळी, मिरवणे, गुढे, मालघर, वैजी, भिले, कालुस्ते, खोपड येथील ५५३ शेतकऱ्यांनी या शेतकरी मेळाव्याचा व कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला. घरडा हॉस्पीटलच्यावतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ ४५ शेतकऱ्यांनी घेतला.
कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिलेले घरडा केमिकल्सचे बापूसाहेब पवार, तुषार हळदवणेकर तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालदोली गावातील संपूर्ण ग्रामस्थ, सरंपच अबिदा तांबे, उपसरपंच योगेश भोबेकर, माजी सभापती व कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग माळी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश हरवंदे, सुहास माळी, कृष्णा माळी, हरिश्चंद्र बांद्रे, पुरुषोत्तम खळे, विजय भोबेकर, बारकू खाडे, सुदेश पवार, चंदुशेठ वरवडेकर, अभिजित हरवंदे, गणपत पाटील, प्रविण जुवळे, प्रदीप मोरे, दत्ताराम शिगवण, प्रमोद देवरुखकर, सरिता माळी, मंजिवनी खळे, स्मिता पाटील, सर्व वाडयांचे प्रमुख, हायस्कुलचे मुख्याध्यापक, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे संजय क्षीरसागर, संतोष बुरटे, समीर झगडे, अमोल म्हसकर, राजेश दिवेकर, कृषी विभागातील उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र माने, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न मेहेत्रे, मंडळ कृषी अधिकारी राहुल आडके आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले.