राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर ईद उल अदहा बाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ईद साजरी करण्याबाबत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत.
अशा आहेत गाईडलाईन
1) ऑनलाईन द्वारे बकरे खरेदी करा
2) बकरे खरेदी करण्यासाठी बाजार भरणार नाही
3) कुर्बानीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी करू नये
4) प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी आपल्या नावानं ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करून घ्यावी
5) कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याबाबत काळजी घ्यावी
6) मुंबईबाहेर कुर्बानी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
7) राहत्या घरीच बकरी ईदची नमाझ अदा करावी
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईद उल अदहा संदर्भात गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. मुस्लिम बांधवांनी ईद घरीच साजरी करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.