खेड : तालुक्यातील देवघर मावळतवाडी, मधलीवाडी आणि उगवतवाडी येथील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना (उबाठा गट) पक्षात प्रवेश केला आहे.

रविवारी, शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत, उपनेते व आमदार राजन साळवी, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, कोकण पदवीधर मतदार संघाचे निवडणूक प्रमुख किशोर जैन, माजी आमदार संजय कदम, यांनी देवघर गावातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षात प्रवेश दिला.

याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, बशीर हमदूले, हशमत परकार, माजी नगरसेवक अजय माने, उपतालुकाप्रमुख विष्णू आंब्रे, तालुका महिला आघाडीच्या संघटक अंकिता बेलोसे, हभप महाडिक, माजी सरपंच प्रकाश गायकवाड, उपविभाग प्रमुख दिलीप निकम, कर्टेलचे माजी सरपंच श्रीधर चव्हाण, शिवसैनिक विष्णू कदम, युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे, शहरप्रमुख दर्शन महाजन, जिल्हा सचिव राकेश सागवेकर, गौरव तोडकरी, आयटीसेलचे मधूर चिखले, मलीक मणीयार, अरबाज कादिरी, भरणे सरपंच संतोष गोवळकर, माजी सरपंच संदीप खेराडे, विभाग प्रमुख अंकुश कदम, विश्वास कदम, राजू मोहणे, सईद तिसेकर सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना व सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवघर गावातील या पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये बाळाजी मोरे, कृष्णा महागावकर, पांडूरंग मोरे, संदीप मोरे, संतोष मोरे, मंगेश मोरे, विष्णू मोरे, आकाश मोरे, दिलीप सागवेकर, रवींद्र मोरे, विकास मोरे, महेश मोरे, संतोष मुंडेकर, गणपत मुंडेकर, शामराव मोरे, श्रीकांत मोरे, प्रकाश मोरे, रामचंद्र मोरे, संतोष जगताप, बबन जगताप बबन सकपाळ आदींसह इतरांचा समावेश होता.