मुंबई: राज्यात रविवारी मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून आले आहेत. तर, करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही नवीन आढळून आलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत बरीच कमी असल्याचेही समोर आले आहे. खरंतर मागील काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आढळून येत होती. परंतु आता पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या जास्त दिसत आहे. रविवारी दिवसभरात राज्यात ९ हजार ३३६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ३ हजार ३७८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यात आज १२३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.