ना. योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण
दापोली : दापोली डेपो मधील बसेसची अवस्था खूपच खराब झाली होती. पावसामध्ये बसेसमध्ये पाऊसाचं पाणी गळण्याचंं प्रमाण वाढलेलं होतं. त्यामुळे नव्या बसेसची मागणी सातत्याने प्रवाशांच्या माध्यमातून होत होती.
प्रजासत्ताक दिनी नागरिकांची ही मागणी मान्य झाली आणि आठ नव्या बसेस दापोली डेपोमध्ये दाखल झाले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा अतिशय दिमागदार कार्यक्रमांमध्ये पार पडला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नामदार योगेश कदम म्हणाले की, भविष्यामध्ये दापोली आगारात बसेसची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

सध्या आठ बसेस जरी दापोली साठी मिळाले असल्या तरी भविष्यात हा आकडा 80 पर्यंत वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दापोलीवर लक्ष देतानाच खेड आणि मंडणगडकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्रीही ना. योगेश कदम यांनी दिली आहे.
दापोलीत दाखल झालेल्या या बसेस बीएस 6 प्रणालीच्या आहेत. महाराष्ट्र शासनाने 5000 नव्या बसेस सेवेत आणण्याचे ठरवले असून यावर्षी महाराष्ट्राला त्या बसेस उपलब्ध होणार आहेत.

सध्या दापोलीला 8 बसेस मिळाल्या आहेत. भविष्यात कशी होईल याकडे मी लक्ष देणार आहे. पुढील काळात इलेक्ट्रिक श्रेणीतील बसेस दापोली आगाराला देण्यात येणार आहे आहेत.
एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास होण्यासाठी चालक आणि वाहकाने अत्यंत जबाबदारीने काम केलं पाहिजे, असं आवाहन देखील आमदार योगेश कदम यांनी केलं आहे.
यावेळी तालुकाप्रमुख उन्मेश राजे, माजी सभापती किशोर देसाई, चारुता कामतेकर, प्रकाश कालेकर, राजेंद्र पेठकर, कृपा घाग, शबनम मुकादम, निलेश शेठ, दिप्ती निखार्गे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या लढ्याला यश
दापोली आगाराला या नव्या बसेस मिळण्यासाठी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच पत्रकार संघटनेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून सातत्याने प्रयत्नही केला जात आहे. याबद्दल व्यवस्थापनातर्फे पत्रकारांचे विशेष आभार मानण्यात आले.
बसेसची सजावट करण्यासाठी कोकण एसटी प्रेमी, दापोली मंडणगड तालुका प्रवासी मित्र संघटना, यांत्रिकी विभागाचे कर्मचारी चालक वाहक व अधिकारी यांनी प्रयत्न केले.

यावेळी मान्यवरांचे स्वागत आगार व्यवस्थापक उबाळे यांनी केले. यावेळी कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर, हर्षल नाफडे, तुषार कोळी, अजित बाळ, शरद देवळेकर प्रकाश, जोशी अनिल साळुंखे, संसारे, सचिन राजेशिर्के यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.