रत्नागिरी : कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात परिस्थिती फार चांगली नाहीये. (Ratnagiri corona update) काल ५०० वरून पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा २५९ आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण आज पुन्हा एकदा ६८५चा आडका ऐकून धडकी भरली आहे. (Dapoli highest) दापोलीत तर एका दिवसात १६२ रूग्ण सापडले आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळेच राज्य सरकारनं संपूर्ण लॉकडाऊन करण्याचं ठरवलं आहे, असं दिसतंय.

संपूर्ण जिल्ह्याची तालुकानिहाय पॉझिटिव्ह रूग्णांची आकडेवारी जर आपण पाहिली तर रत्नागिरी १५२, दापोली १६२, खेड ५५, गुहागर ३४, चिपळूण ९५, संगमेश्वर १६६ मंडणगड ८, लांजा ११ आणि राजापूरमध्ये २ रूग्ण आढळले आहेत. आरटीपीसीआर चाचणीत ४२४ पॉझिटिव्ह सापडले आहेत तर अँटिजेन टेस्टमध्ये २६१ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

मृतांचा आकडा पोहोचला ४७५

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनामुळए दागावलेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज एका दिवसात ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत वर्षभरात केवळ कोरोनामुळे ४७५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी १२२, खेड ६९, गुहागर १९, दापोली ५३, चिपळूण १०५, संगमेश्वर ५७, मंडणगड ६, लांजा १८ आणि राजापूरमध्ये २६ लोकं दगावली आहेत. सर्वांधिक मृत्यूची नोंद रत्नागिरी तालुक्यात झाली आहे तर सर्वांत कमी मृत्यूची नोंद मंडणगड तालुक्यात नोंदवली गेली आहे.

राज्यात कडक लॉकडाऊन होणार

केवळ एका नव्हे तर थोड्या फार फरकानं संपूर्ण राज्यात कोरोनाची स्थिती बिकट आहे. सध्या तरी कोरोनावर एकच उपाय दृष्टीस पडत आहे तो म्हणजे लॉकडाऊन. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर दबाब आणत लॉकडाऊन करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी राज्यात संपर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकणार आहे.

सकारात्मक रहा… त्वरीत तापासणी करा

कोरोनाशी लढताना सकारात्मक मानसिक्ता ठेवणं नितांत गरजेचं आहे. कोरोना स्दृष्य कोणतीही लक्ष्णं दिसली की त्वरीत तपासणी करून घ्या. सध्या कोरोनाचं निदान जेवढ्या लवकर होईल तेवढ्या वेगानं उपचार सुरू करता येतील. कोरोना रूग्णांवर तातडीनं उपचार सुरू होणं आवश्यक आहे. त्यामुळे ताप कुणीही अंगावर काढू नये, असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केलं आहे.