नागपूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कचर्याच्या ढिगार्यात काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत 5 अर्भकं सापडली आहेत. क्वेटा कॉलनी येथील जुना देवडिया रुग्णालयाच्या भिंतीजवळ ही अर्भकं सापडली. 3 ते 5 महिन्याची ही अर्भकं आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.