रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे. आज शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत आज ४०१ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापुर्वीचे मृत्यू रूग्ण २१ आणि आजचे मृत्यु रूग्ण २ असे मिळून २३जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर १०३५ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी ६०
▪️दापोली ६८
▪️चिपळूण ८९
▪️संगमेश्वर ५६
▪️मंडणगड ११
▪️गुहागर २०
▪️खेड ४७
▪️राजापूर २७
▪️लांजा २३
एकूण ४०१
