रत्नागिरी : प्रतिनिधी
कोरोनाचे रूग्ण जिल्ह्यामध्ये वेगानं वाढत आहेत. ग्रामिण भागामध्येही कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत आहे. त्यातच रत्नागिरीमध्ये पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, कैदी आणि नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. शनिवारी रात्री तब्बल ३८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
कोरोनापासून प्रत्येकानं सावधानता बाळगणं आवश्यक आहे. रत्नागिरीतील काही पोलीसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं रत्नागिरीतील तब्बल ३८ पोलीसांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही नमुने घेण्यात आले होते. ३६ तासांच्या प्रतिक्षेनंतर या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मिळाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
रत्नागिरीमध्ये पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१० पर्यंत पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनानं सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पाळण करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.