बेळगाव : कोरोनाच्या काळात बोर्डानं परिक्षा घेण्याचा आचरटपणा केल्यामुळं कर्नाटकातील बेळगाव येथील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या 80 विद्यार्थ्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.
परीक्षेसाठी जाताना संबंधीत केंद्रानं कोरोनाचा प्रदूर्भाव पसरू नये म्हणून हँड सॅनिटायझर उपलब्ध दिलं होतं. त्याचबरोबर वर्गाचं निर्जंतुकीकरण देखील केलं होतं. कन्टेंन्मेंट झोनमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी बैठक व्यवस्थाही केंद्रानं केली होती. तरी या सर्व उपाययोजना फोल ठरले आहेत. ३२ विद्यार्थ्यांना कोरोना लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.
सुरुवातीला मार्च महिन्यात होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. परीक्षा होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. कोरोनाचं संकट असताना परीक्षा होणार म्हणून पालक आणि विद्यार्थी यांच्यातही भीतीचे वातावरण होते. परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे त्याचं वेळापत्रक रद्द करुन आता 25 जून ते 3 जुलै दरम्यान घेण्यात आल्या.
दरम्यान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अनिवार्य करण्याचा आदेश नुकताच यूजीसीने काढला आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या जीवाशी केंद्र सरकार का खेळतंय? असा सवाल युवासेनेने उपस्थित केला आहे.
कर्नाटकात कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याप्रकरणी विरोधकांनी सरकारला जबाबदार धरलं आहे.
महाराष्ट्र सरकरानं अंतिम वर्षाच्या परीक्षा आधिच रद्द केल्या आहेत. त्यात युजीसीनं परीक्षा घेण्यासंदर्भात सुचना केल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. सरकारनं काही झालं तरी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पत्र त्यांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे. आता यावर केंद्र सरकार काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.