खेड : घरडा केमिकल्स येथील कामगारांची खाजगी प्रयोग शाळेत तपासणी केली. त्यात 30 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले. त्यामुुळे जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 942 झाली आहे.
दरम्यान रत्नागिरीत दाखल एका कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्णाचा आज ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या 33 झाली आहे.
दरम्यान 7 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 634 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड केअर सेंटर, समाज कल्याण, रत्नागिरी येथून 4 तर जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी 3 रुग्णांचा समावेश आहे.
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह ची संख्या 275 असून आज मौजे बसणी, साळवी स्टॉप परिसर हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
मंगळवार सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 942
बरे झालेले – 634
मृत्यू – 33
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 275