दापोली : शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एक अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वणोशी खोतवाडी इथं तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे तीनही महिला जळून मृत्युमुखी पडल्या आहेत.
या घटनेमध्ये सत्यवती पाटणे -75, पार्वती पाटणे- 90 व इंदुबाई पाटणे 85 या तीन महिलांचा जळून मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी पोलीसांनी सखोल चौकशीला सुरूवात केली आहे. या तीनही महिलांचा एकमेकींना आधार होता. अचानक अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं या प्रकरणामध्ये संशयाचा वास येऊ लागला आहे. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.