नांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन
नांदेड : जिल्ह्यात व शहरात एक ते दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिका सातत्याने यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाही नांदेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात नाईलाजास्तव २५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी व्यक्त केले.
