नवी दिल्ली, – देशाला चालू वर्षात विविध नैसर्गिक आपत्तींनी तडाखा दिला. त्यामध्ये 2002 नागरिक मृत्युमुखी पडले, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल देण्यात आली.
चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, पूर आणि दरडी कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना देशाच्या विविध राज्यांत घडल्या. त्यामध्ये सर्वाधिक जीवितहानी महाराष्ट्रात घडली. महाराष्ट्रात 489 मृत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल गुजरात आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी 162 जणांनी जीव गमावला. संबंधित आकडेवारी चालू वर्षीच्या अखेरच्या 9 महिन्यांतील आहे.
त्या कालावधीत विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली. मात्र, त्याचा तपशील देण्यात आला नाही.