उद्या जिल्ह्यातील ३००० सदस्य करणार चिपळुण बाजारपेठेची साफसफाई
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण येथे आलेल्या महापुरामुळे मोठे संकट आल्यानंतर हजारो कुटुंब रस्त्यावर आली आहेत. चिपळुणला २००५ मध्ये आलेल्या पुरापेक्षा यावर्षीही आलेला पुर हा महाभयंकर होता. २००५ पेक्षा अडीच पट अधिक पाणी आल्याने चिपळुण मधील अनेक संसार उघड्यावर आले आहेत. चिपळुण मध्ये व्यापारी वर्गाचे सर्वाधिक नुकसान झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने महापूर, दुष्काळ, कोरोना अशा काळात संकटाच्या काळात वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. दापोली तालुक्यातील नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानचे २०० अनुयायी चिपळूणमधील जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग तसेच पसरलेली दुर्गंधी, सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेली दलदल साफ करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले दिसून आले. यावेळी शेकडो टन कचरा उचलत आहेत. चिपळूण शहरात चार दिवस कचऱ्याचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत होते.यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन संस्थानचे काही तालुक्यातुन २०० तर काहि तालुक्यातुन १०० सदस्य चिपळुण येथे या मोहिमेत सहभागी झाले आहेत. चिपळूण शहरातील आणि उपनगरातील सर्व ठिकाणचा कचरा मोठ्या प्रमाणात उचलण्याचे काम करताना सामाजिक बांधिलकी चे उत्तम उदाहरण दाखवून दिले. उद्या दि.२८ जुलै २०२१ ला संस्थानाच्या वतीने जिल्ह्यातील ३००० सदस्य चिपळुण बाजारपेठेची साफसफाई करणार आहेत.
या मोहिमेमध्ये दापोली तालुका प्रमुख अजय खोपटकर, प्रसिद्धी प्रमुख विनोद धोत्रे, दापोली तालुका निरीक्षक सुनिल दाभोलकर, दत्ताराम दवंडे, रोहिणी घातकर, सुरेश कासेकर, जान्हवी ओतारी, दिनेश जावळे आदी भक्त व शिष्य गण आदींनी सहभाग घेतला होता.
