भाजपाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल

दापोली : नगरपंचायतीच्या निवडणुकीत 6 डिसेंबर 2021 रोजी दोन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. हे दोन्ही अर्ज भाजपच्या उमेदवारांनी भरले आहेत.

वार्ड क्रमांक 17 मधून अमोल तांबे यांनी आपली उमेदवारी भरली आहे तर उदयनगर वॉर्डात भाजपाकडून पुन्हा एकदा जया साळवी रिंगणात राहणार आहेत.

नगरपंचायत निवडणुकीची रंगत आता हळूहळू वाढत जाणार आहे. भाजपच्या या दोन्ही उमेदवारांनी स्वतःला प्रचारासाठी मोकळ करून घेतलं आहे.

1 डिसेंबर 2021 पासून निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्याला सुरुवात झाली होती. पण पहिला अर्ज सहा तारखेला भरला गेला.

टू द पॉईंट : episode 3

अमोल तांबे यांच्या पत्नी रमा तांबे या वडाचा कोंड या मतदारसंघात सध्या नगरसेविका आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या घरात उमेदवारी मिळाली आहे आहे. गेल्या पाच वर्षातील संपर्काच्या जोरावर या निवडणुकीत बाजी मारण्याचा त्यांना विश्वास आहे.

जया साळवी उदयनगरमधून सातत्यानं निवडून येत आहेत. यंदाची निवडणुकी त्यांना सोपी जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*