रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांत आज दि. १० मे कोरोनाप्रतिबंधक दुसरी लस दिली जाणार आहे. ही लस ४५ वर्षांवरच्या नागरिकांसाठी आहे. कोविशील्ड या लशीच्या फक्त दुसऱ्या डोससाठी १० मे रोजी लसीकरण होणार आहे. नोंदणी थेट केंद्रावरच करायची आहे. जिल्ह्यात ८० केंद्रांवर १८ हजार जणांना ही लस दिली जाणार आहे. कोणत्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील किंवा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर किती जणांना लस दिली जाणार आहे, त्याचा तपशील असा –
१) मंडणगड (एकूण ५००) – पंदेरी १००, कुंबळे १००, देव्हारे १००, मंडणगड ग्रामीण रुग्णालय २००.
२) दापोली (एकूण २०००) – आंजर्ले २००, केळशी २००, आसूद २००, उंबर्ले २००, साखळोली २००, फणसू २००, पिसई २००, सोहोनी विद्यामंदिर ४००.
३) खेड (एकूण २०००) – कोरेगाव २००, फुरूस २००, आंबवली २००, वावे २००, लोटे २००, शिव बुद्रुक २००, तिसंगी २००, खेड उपजिल्हा रुग्णालय ४००.
४) गुहागर (एकूण १४००) – आबलोली २००, कोळवली २००, हेदवी २००, तळवली २००, चिखली २००, जीवन शिक्षण विद्यालय ४००.
५) चिपळूण (एकूण २८००) – रामपूर २००, कापरे २००, खरवते २००, दादर २००, अडरे २००, शिरगाव २००, सावर्डे २००, फुरूस २००, वहाळ २००, चिपळूण पोलीस कार्यालय ५००, चिपळूण उपजिल्हा रुग्णालय ५००.
६) संगमेश्वर (एकू २६००) – माखजन २००, कडवई २००, वांद्री २००, कोंडउमरे २००, फुणगूस २००, धामापूर २००, साखरपा २००, सायले २००, बुरंबी २००, देवळे २००, निवे २००, देवरूख ग्रामीण रुग्णालय ४००.
७) रत्नागिरी (एकूण ३०००) – कोतवडे २००, मालगुंड २००, वाटद २००, जाकादेवी २००, पावस २००, चांदेराई २००, खानू २००, हातखंबा २००, कोकणनगर ५००, पटवर्धन हायस्कूल ४००, मेस्त्री हायस्कूल ५००.
८) लांजा (एकूण १५००) – भांबेड २००, शिपोशी २००, साटवली २००, वाडीलिंबू २००, जावडे २००, रिंगणे २००, लांजा हायस्कूल ३००.
९) राजापूर (एकूण २२००) – करक-कारवली २००, केळवली २००, जवळेथर २००, फुफेरे २००, ओणी २००, जैतापूर २००, कुंभवडे २००, सोलगाव २००, धारतळे २००, राजापूर ग्रामीण रुग्णालय ४००.