रत्नागिरी जिल्ह्यातील १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील १५ पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या या सन्मानचिन्हाने त्यांच्या उत्कृष्ट सेवेचा गौरव करण्यात येणार आहे.

प्रवर्ग-१० अंतर्गत विशेष सेवा गटात रत्नागिरी पोलिस मुख्यालयातील पोलिस हवालदार नितीन डोळस यांचा समावेश आहे.

तसेच, प्रवर्ग-८ अंतर्गत १५ वर्षांच्या उत्कृष्ट सेवेसाठी रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे सहाय्यक पोलिस फौजदार सुधाकर रहाटे, महामार्ग पोलिस मदत केंद्र हातखंबाचे सहाय्यक पोलिस फौजदार संजय मुरकर, देवरुख पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार दिपक पवार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत, रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार दिनेश आखाडे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे पोलिस हवालदार विजय मोरे, पूर्णगड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रकाश मोरे, महिला पोलिस हवालदार सोनाली शिंदे, अलोरे पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार दिपक ओतारी, जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार मिलिंद कदम, चिपळूण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रितेश शिंदे, दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संतोष सडकर आणि पूर्णगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार महेश सावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*