रत्नागिरी दि. 06(जिमाका): गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 4 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2016 झाली आहे. दरम्यान 14 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1371 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये माटे हॉल, चिपळूण 9, समाजकल्याण मधील 3 आणि देवधे, लांजा येथील 2 रुग्ण आहे.
*पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे*
रत्नागिरी – 1
राजापूर – 3
तारा ऑर्कीड,, रत्नागिरी येथील ६६ वर्षीय आणि गोळप, रत्नागिरी येथील ६८ वर्षीय कोरोना रुग्णांचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 68 झाली आहे.
*तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे* .
रत्नागिरी – १८
खेड – ६
गुहागर – २
दापोली – १४
चिपळूण – १३
संगमेश्वर – ७
लांजा – २
राजापूर – ५
मंडणगड – १
*सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे*
एकूण पॉझिटिव्ह – 2016
बरे झालेले – 1371
मृत्यू – 68
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 577
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा संख्या 577 आहे. आज मौजे एकता नगर, कोळंबे, रत्नागिरी, मौजे साई भूमी नगर, शिरगाव, रत्नागिरी, पारस ओसीअन व्हू अपार्टमेंट, थिबा पॅलेस, रत्नागिरी, शासकीय वसाहत, आरोग्यमंदीर, रत्नागिरी, आंबेशेत, कुर्टेवाडी, रत्नागिरी, उत्कर्षनगर, कुवारबाव, रत्नागिरी, विठ्ठल मंदीर मागे, कुवारबाव, रत्नागिरी, प्रतिभा महिला वसतीगृह, रत्नागिरी, संभाजीनगर, नाचणे, रत्नागिरी, तारा ऑर्कीड, माळनाका, रत्नागिरी, मौजे सैतवडे चिंच बंदर, रत्नागिरी, मेंटल हॉस्पीटल, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
*संस्थात्मक विलगीकरण*
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 49, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 34, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -11, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 1, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 3, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 21, गुहागर – 1, संगमेश्वर – 1असे एकूण 127 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
*होम क्वॉरंटाईन*
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 29 हजार 707 इतकी आहे.
*16 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह*
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 19 हजार 222 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 18 हजार 565 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2016 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 16 हजार 537 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 657 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 657 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 05 ऑगस्ट 2020 अखेर एकूण 2 लाख 37 हजार 074 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 11 हजार 704 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 06 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.