आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार दापोलीमध्ये आणखी 13 रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दापोलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
दापोलीमधून आज 2 रुग्णांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलवण्यात आलं आहे. तालुक्यातून टाळसुरे, हर्णै, बुरोंडी, आडे या गावांमध्ये अलीकडच्या काळात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या भागातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आज सापडलेले रुग्ण कोणत्या गावातील आहेत याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात आहे.