11 वर्षीय कनिका सुधीर चुनेकर हिचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : शहरातील माळनाका परिसरातील तारा पार्कच्या बी विंगच्या टेरेस वर खेळणाऱ्या अकरा वर्षीय बालिकेचा कपड्यामध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे.

मुळचे दापोलीतील असलेले सुधीर चुनेकर पत्नी, दोन मुलांसह तारापार्कच्या बी विंगच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. बुधवारी सायंकाळी सर्वजण घरात असताना मुलगी कनिका चुनेकर ही टेरेस वर खेळण्यासाठी गेली होती. खूप वेळ ती परत न आल्याने आई तिला बघायला टेरेसवर गेली. यावेळी कनिका कपड्यात अडकलेल्या स्थितीत दिसली. आईने मुलीला या अवस्थेत पाहून हंबरडा फोडला. शेजारील लोकं धावत आले. त्यांनी कनिकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दखल केले. परंतु ती मृत्यू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.

*- माय कोकण*
https://mykokan.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*