दापोली तालुक्यात 11 रूग्ण पॉझिटिव्ह, सर्वाधिक हर्णैमध्ये

दापोली : तालुक्यात गेल्या चोवीस तासात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दापोली मध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या स्थिर होत आहे. ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक रूग्ण सध्या आढळत आहेत. (Harnai covid-19 patients)

इराणमध्ये कोरोनाची महाभयंकर लाट आली आहे. तिथल्या सरकारी आकडेवारीनुसार दर दोन मिनिटाला एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद इराणमध्ये होत आहे. याचा अर्थ भारतामध्येही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या संदर्भात देण्यात आलेल्या सूचना नागरिकांनी पाळणं आवश्यक आहे. तिसरी लाट थोपवायची असेल तर खबरदारी घेणे खूप गरजेचं आहे. कोरोना रूग्ण कुठे आढळले आहेत याची माहिती खाली देण्यात येत आहे,

हर्णै – 4
जालगाव – 1
कर्दे – 2
काळकाई कोंड – 1
असोंड – 3

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*