Virus

101 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 2391 बरे झालेले 1597 : प्रमाण 66 टक्के
रत्नागिरी दि. 11 (जिमाका): काल सायंकाळपासून 101 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2391  झाली आहे.  आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, संगमेश्वर 1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2,   कोव्हीड केअर सेंटर घरडा 5, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे चिपळूण 14, कोव्हीड केअर सेंटर रीम्झ हॉटेल 1 अशा 26 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.    होम आयसोलेशन मध्ये असलेले 03 रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1597  झाली आहे.
           
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
रत्नागिरी – 46
दापोली-08
कळंबणी-06
कामथे-27
अँटीजेन-14
 
            आज प्राप्त झालेल्य माहितीनुसार 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. खेड तालुक्यातील  पुरेखुर्द येथील 49 वर्षीय जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे मृत्यु झाला.  चाकाळे ता.खेड येथील 66 वर्षाच्या रुग्णांचा रत्नागिरी येथे दाखल करण्यास आणत असताना प्रवासादरम्याने मृत्यू झाला.  हर्णे ता. दापोली येथील 70 वर्षीय रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.   त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 83 झाली आहे.
 
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2391
बरे झालेले  – 1597
मृत्यू  – 83
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 711
           
 ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
            जिल्ह्यात सध्या 202 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 34 गावांमध्ये,  दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 43 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 4, चिपळूण तालुक्यात 100 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 2, गुहागर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
 
संस्थात्मक विलगीकरण
            संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी –  39,   समाजकल्याण, रत्नागिरी – 6,  उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 51,  उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -18, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 3, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 1, पाचल -1असे एकूण 146 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
 
होम क्वॉरंटाईन
          मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 49  हजार 405 इतकी आहे.
 
17 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
            जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 20 हजार 984  नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 19 हजार 741 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2391 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 17 हजार 812 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 769 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.   769 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.  
            परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि.  10 ऑगस्ट 2020 अखेर एकूण 2 लाख 70 हजार 207 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 16 हजार 609 आहे.  
          होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक,  नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
          सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे.  ही माहिती      दि. 11 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.  यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो.  पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची  माहिती देण्यात येईल.