दापोली : सीबीएसई बोर्ड अंतर्गत दहावीच्या परीक्षेचा ब्रिलियंट करिअर अकॅडमी संचलित रामराजे इंटरनॅशनल स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
या शाळेतील ओवेस नागोठणे याने 92 % मार्क्स मिळवत शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच स्वराज मुरुडकर याने 90% मार्क्स मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
शिस्तबद्ध अभ्यासाचे नियोजन, प्रचंड मेहनत आणि ध्येय दृष्टीने केलेला अभ्यास यामुळेच हे यश मिळाले असे मत ओवेस नागोठणे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार यश मिळाले पाहिजे यासाठी शाळा कटिबद्ध असून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी अतोनात मेहनत घेतली जाते.
इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेगळे पॅटर्न शाळेने तयार केले असून त्याचीच प्रचिती ही निकालामध्ये प्राप्त झाली आहे.
या यशामध्ये पालकांचा, शिक्षकांचा आणि शाळा प्रशासनाचा महत्त्वाचा वाटा आहे.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संचालक संदीप राजपुरे, संदीप खोचरे, संदीप सावंत आणि डॉ. उमेश वैशंपायन यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले आहे.