दापोली । प्रतिनिधी

दापोलीतील कासम सत्तार मिरकर यांची पत्नी व सून दिनांक २१/१०/२०२० रोजी सकाळी ०७.०० वा. दापोलीतील साद अपार्टमेंट रुम नं. ०२ या फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावुन बुरोंडी येथे गेले होते. 23 ऑक्टोबरला सकाळी 7 वा. मेहुणे आयुब मिरकर यांनी फोन करुन कळविले कि, ब्लॉकचा पुढील कासम मिरकर यांच्या मेवण्यानं फोन करून दरवाज्याचे कुलुप कोणीतरी तोडले असल्याचे सांगितले. त्यानंतर कासम मिरकर यांनी येऊन फ्लॅटमध्ये ठेवलेल्या सोने व चांदिच्या वस्तुंची खात्री केली असता 1 लाख किंमतीचे 37 हजार 200 रुपयांच्या सोन्या, चांदिचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने नेल्याचे लक्षात आलं. यामध्ये १,३२,०००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने व ५,२००/- रु. किंमतीचे चांदिचे दागिने चोराने लांबवले आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप निरीक्षक कांबळे याचा तपास करत आहेत.

*- माय कोकण*
https://mykokan.in