श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांचा सन्मानपत्र देऊन भव्य सन्मान

रत्नागिरी –
श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धा ही रत्नागिरीपुरतीच मर्यादित न राहता ही स्पर्धा संपूर्ण राज्यात राबवण्यात आली पाहिजे. इथे सर्वधर्म समभाव मानला जातो. इथे कोणताही भेदभाव केला जात नाही. आज माझा सन्मान झाला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले नसते तर मी आज उद्योग मंत्री पदापर्यंत पोचलो नसतो याची नम्रतापूर्वक जाणीव मला आहे.

माझ्या कुटुंबाने मला नेहमीच पाठबळ दिले आहे. पण माझे खरे कुटुंब हे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मंगलमूर्ती प्रतिष्ठान सारखी आदर्शवत प्रतिष्ठान आहे याचा मला अभिमान आहे.

उद्योग मंत्री झाल्यानंतर मोठमोठ्या उद्योजकांशी माझी ओळख झाली. वेळोवेळी मी या उद्योजकांकडे मी मागणी केली एखादा तरी प्रकल्प रत्नागिरीत आणा. यातून हजारो तरुणांना रोजगार प्राप्त होईल.

नुकतीच एक बैठक पार पडली. एप्रिल पेपर या कंपनीसोबत बैठक झाली. या कंपनीने पेपर कंपनी रत्नागिरीत सुरू करावी अशी मागणी होती आणि याकरिता तत्वतः मान्यता देखील मिळाली आहे.

किमान दहा हजार कोटीचा हा प्रकल्प आणण्याचा मानस आहे असे मत उद्योग मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने आयोजित श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धा २०२३ चा बक्षीस वितरण सोहळा मराठा भवन येथे पार पडला.

यावेळी राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिला घोसाळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले, पत्रकार अलिमिया काझी, माजी नगरसेवक राजन शेट्ये, संयोजन समिती अध्यक्ष राकेश चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी आपल्या मनोगतात उर्मिला घोसाळकर म्हणाल्या की, उदय सामंत स्वकर्तृत्वावर उद्योग मंत्रीपदापर्यंत पोचले. आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने आज त्यांचा सत्कार होतोय ही महत्त्वाची गोष्ट आहे.

सर्वधर्म समभाव पद्धतीने मंडळाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातात. हे ३० वे वर्ष आहे. संपूर्ण राज्यात रत्नागिरीत श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने मंगलमूर्ती सजावट स्पर्धा आयोजित केली जाते या सगळ्याचे श्रेय रत्नागिरी करांनाजाते असे मत यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमावेळी श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.