रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रूग्ण वाढीची संख्या अधिक वेगवान आहे. सरकारनं आणि जिल्हा प्रशासनानं कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज ठेवणं गरजेचं आहे. पण रत्नागिरीतील महिला रूग्णालयामध्ये सध्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना रूग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं आवश्यक आहे.

गेल्या आठवड्याभरात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अधिकचे बेड्स लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. महिला रूग्णालय, डिएड. कॉलेजमध्ये सध्या कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. याठिकाणी चांगल्या दर्जाची उपचार सुविधा मिळण्यासाठी प्रशासनानं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.